आता या ही नोटा होणार बंद। चलनात येणार नव्या नोटा | Latest Lokmat News Update | Lokmat News

2021-09-13 5

५० आणि ५०० रुपयांच्या नोटा बदलून झाल्यानंतर आता १० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १० रुपयाच्या नोट बदलाची घोषणा केली होती.

महात्मा गांधी सीरिजअंतर्गत १० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यात आली आहे. नोटांचा रंग तपकरी (चॉकलेट ब्राऊन) असा आहे. तसेच त्यावर कोणार्क येथील सूर्यमंदिराचे छायाचित्र आहे. रिझर्व्ह बँकेने या नोटांची छपाई केलेली असून लवकरच त्या चलनात येणार आहेत. सध्या चलनात असलेल्या १० रुपयांच्या नोटा २००५ साली बदलल्या होत्या. त्यावर पुढे महात्मा गांधी यांचे छायाचित्र, तर मागे हत्ती, वाघ आणि गेंडय़ाचे मिळून छायाचित्र आहे. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने ५०० च्या नवीन नोटा, २०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires